‘चांदोली’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के | पुढारी

‘चांदोली’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर : चांदोली धरण परिसरामध्ये शुक्रवारी (दि. 26) भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री 2 वाजून 22 मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची तीव—ता 3.4 रिश्टर स्केल इतकी होती; तर सकाळी 7 वाजता जाणवलेल्या भूकंपाची तीव—ता 3.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून पश्‍चिमेस 200 किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले आहे. हे भूकंप सौम्य असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र एकाच दिवशी दोनदा जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाच्या धक्य्यांमुळे धरणाला कोणत्याही प्रकारची झळ लागली नसल्याचे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापुरात भूकंपाचा धक्‍का जाणवला नाही

शुक्रवारी विजापूर परिसरात झालेल्या भूकंपाची चांदोली परिसरातही नोंद झाली. मात्र जिल्ह्यात हा भूकंप जाणवला नाही. कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. तसेच जिल्ह्यात या भूकंपाची नोंद झाली नसल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Back to top button