कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा बंद | पुढारी

कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिंगणापूर योजनेवरील इ 1100 मि.मी. मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्यात येणार असल्?याने सोमवारी (दि. 1) संपूर्ण पाणी उपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. त्?यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असणार्‍या कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड, संलग्‍नित उपनगर या भागांत सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारीही (दि. 2) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

ए, बी वॉर्ड व त्यास संलग्‍नित भागांमध्ये संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, वारे वसाहत, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडा पार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील संपूर्ण भाग, वाय. पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी तसेच ई वॉर्डातील राजारामपुरी पहिली ते 13 वी गल्‍ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला, कोरगावकर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्‍ला, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम—ाटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशीद कॉलनी, माने कॉलनी, एस.टी. कॉलनी, संयुक्‍त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमणमळा, केव्हीज पार्क, नागाळा पार्क, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत, मार्केट यार्ड, कावळा नाका, स्टेशन रोड, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्‍ली, व्यापारपेठ या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Back to top button