माझी राज्यसभेला का आठवण झाली नाही? : राजेश क्षीरसागर | पुढारी

माझी राज्यसभेला का आठवण झाली नाही? : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला, असे सांगणार्‍या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीत त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण का झाली नाही, अशी खदखद व्यक्त केली.

क्षीरसागर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असल्याने नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते. ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही. यावरून संजय पवार यांच्या उमेदवारीला आपला कडाडून विरोध होता हे आता त्यांनी अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले. जिल्ह्यातील राजकारणात संजय पवार यांची कधीच साथ मिळाली नाही. ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही तरीही त्?यांना उमेदवारी देण्?यात आली. त्यांनीच पक्ष संपवला. आम्ही शिवसेनाप्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार नाही, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

देव मंदिरात राहिला पाहिजे हे म्हणत होतो, पण देवाला बाहेर काढलं आणि टीका होऊ लागली, हे आता त्यांनीच मान्य केले. महाआघाडी लोकांना पटली नव्हती याचा अनुभव आम्हाला येत होता. ही गद्दारी नाही, क्रांती आहे. शिवसेना दुसर्‍याच्या हातात जात होती म्हणून ही क्रांती केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button