सीबीएसई दहावी परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी | पुढारी

सीबीएसई दहावी परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची बाजी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाच्या वतीने दहावीच्या परीक्षेचा अखेर ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

शांतिनिकेतन स्कूल

डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या शांतिनिकेतन विद्यालयाचा दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. 199 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यातील 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक, 78 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांहून अधिक तर उर्वरित विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत.

अर्चा आफळे (98.4 टक्के), आभा आफळे (97), देविका भिवटे (96.08), आशुतोष मुखर्जी (96.2), समीक्षा पाटील (96), ऋग्वेद पाटील (96) टक्के गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनिषा पाटील, श्रीपाद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कोल्हापूर पब्लिक स्कूल

दहावी सीबीएसई परीक्षेत आर. एल. तावडे फाऊंडेशन संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. निशिता बाहेती (97.4) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य गोवईकर-द्वितीय (97), अद्वैय कुलकर्णी-तृतीय (96.6), संस्कार गाडे-चतुर्थ (96.4), अनुष्का जाधव-पाचवा (95.8) क्रमांक मिळविला.

36 विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. त्यातील 90 टक्क्यांवर 15 विद्यार्थी तर 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आहेत. संस्कृत विषयात आदित्य गोवईकर, अद्वैय कुलकर्णी, करण पारीख, निशिता बाहेती, श्रावणी पाटील, श्रेया गावडे व तनया भोसले यांनी शंभर पैकी शंभर गुण पटकावले. गणित विषयात अद्वैय कुलकर्णीने शंभर पैकी शंभर गुण प्राप्‍त केले. विज्ञान विषयात ईशान घोरपडे, तनया भोसले यांनी शंभर पैकी 99 गुण मिळविले. समाजशास्त्र विषयात अनुष्का जाधवने शंभरपैकी 98 गुण मिळवले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थेच्या संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका अंजली मेळवंकी, उपमुख्याध्यापिका आशा आनंद यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button