काेल्‍हापूर : ‘गुडघे व कंबरदुखीवर’ उपचारासाठी शिबिराचे आयोजन | पुढारी

काेल्‍हापूर : 'गुडघे व कंबरदुखीवर' उपचारासाठी शिबिराचे आयोजन

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा : सांधे झीज, गुडघे विकार यावर खात्रीशीर उपचार करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, अरिहंत जैन फाऊंडेशन, पार्श्वनाथ को. ऑप.बँक लि.. कोल्हापूर, संभवनाथ जैन श्वेतांबर संघ, गुजरी यांच्या वतीने मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १० ते ६ या वेळेत हे शिबीर शाहूपुरी ३ गल्ली, मुख्यालय पार्श्वनाथ को. ऑप.बँक येथे होणार असून, यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरासाठी उदयपूर (राजस्थान) येथील तज्‍ज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. विना ऑपरेशन जर्मन टेक्निकचा वापर करून खात्रीशीर उपायासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत .

चालणे, चढउतार करताना देणार्‍या समस्या, सांधे झीज, गुडघे विकार या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित शिबिराची तज्ज्ञ डॉक्टर्स, माफक दरामध्ये उपकरणे ही वैशिष्टय आहेत. अधिक माहिती व नोंदणीसाठी ०२३१ – २६५२५२५ या क्रमांकावर व पार्श्वनाथ को. ऑप.बँकेच्या सर्व शाखांमध्ये संपर्क करण्यात यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button