फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा | पुढारी

फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : फॉरेक्स ट्रेडिंग मधून फायदा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत प्रवीण माळी (रा. हातकणंगले) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

हिरेन पाटील (रा. अमरावती) याने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने जानेवारी 2021 पासून रकमा घेतल्या होत्या. सुरुवातीचे काही महिने तो हा परतावा देत होता. यातूनच या गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन केला होता. यातूनच फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुतंवणूक करून जादा परतावा, काँबिट कॉईन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी फिर्यादी माळी यांच्यासह अनेकांकडून रोख तसेच बँक खात्यावर स्वीकारलेले पैसे त्यांच्या परस्पर इतरत्र गुंतवले.

वेबसाईट बंद झाल्याने भंबेरी

गुंतवणूकदारांसाठी सुरू असणारी ही वेबसाईट अचानक बंद झाल्याने गुंतवणूकदारांचाी भंबेरी उडाली. त्यांनी हिरेन पाटीलसह इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाशीही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे माळी यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहमद हबीब मोहमद हनीफ (गुलबर्गा, कर्नाटक), मोहमद आब्बास मोहमद युसूफ (पंजाब), मोहमदी बेगम जुनेदी (गुलबर्गा), हरजौत कौर ऊर्फ जोया युसूफ फारुकी (पंजाब), राकेशकुमार श्रीमंगलरामजी (मध्य प्रदेश) अशा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.

Back to top button