रत्नागिरी : तब्बल २३ तासानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत | पुढारी

रत्नागिरी : तब्बल २३ तासानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी (दि.13) सायंकाळी साडेसातच्या वाजण्याच्या सुमारास अणस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने सदर मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड बाजूला करून वाहतूक मार्ग सुरळीत केला.

मोठा दगड मार्गवर येऊन पडल्यामुळे घाट रस्ता काही दिवस बंद पडेल अशी शक्यता होती. मात्र, राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता शंतनू दुधाडे अधिकारी स्वप्नील भावधनकर आणि त्यांचे सहकारी यांसह राजापूर पोलीस प्रशासन यांनी अथक मेहनत घेतली व घाटातील दरड हटविली. सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान संपूर्ण घाट मार्ग मोकळा केला आहे. आता घाटातील वाहतूक पूर्ववत झाली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.

Back to top button