नागरकोईल-पनवेल दरम्यान विशेष गाडी 22 ऑगस्टपासून! | पुढारी

नागरकोईल-पनवेल दरम्यान विशेष गाडी 22 ऑगस्टपासून!

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दि. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण 6 फेर्‍या होणार आहेत. वाढत्या गर्दीमुळे कोकण रेल्वेच्या मार्गे प्रवास करणार्‍या प्रवाशांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

या गाडीच्या (06071/06072) नागरकोईल ते पनवेल मार्गावर (06071) दि. 22 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत दर मंगळवारी एकूण तीन फेर्‍या होतील. पनवेल ते नागरकोईल या मार्गावर दि.24 ऑगस्ट 2023 ते सात सप्टेंबर 2023 म्हणजे दर गुरुवारी तीन फेर्‍या म्हणजे या विशेष गाडीच्या जाता- येताच्या एकूण सहा फेर्‍या होणार आहेत. ही गाडी नागरकोईल येथून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दहा वाजून 45 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून ही गाडी रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि नागरकोईलला ती दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोहचेल.

Back to top button