राणेंना उचलण्याचा आदेश अनिल परब यांनी दिला? व्हिडिओ व्हायरल! | पुढारी

राणेंना उचलण्याचा आदेश अनिल परब यांनी दिला? व्हिडिओ व्हायरल!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अनिल परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेत्यांनी ठिय्या मारला होता. अटक वॉरंट असेल तरच कारवाई करा, वॉरंट असेल तर स्वत: गाडीत येऊन बसतो हे नेते सांगत होते. पोलिसांवर राजकीय दबाव आहे.

कारवाईचे आदेश येत आहेत, असेही भाजप नेते म्हणत होते. भाजपच्या या दाव्यानंतर परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचे बोलणे पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होते. मी सध्या रत्नागिरीत आहे. आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो फक्त मी ठरवतो. मग तसे आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावे लागेल ना? हो हो हो मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब ठिकाय… मी आता ताबडतोब बोलतो.

त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय.. त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं? नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये? हं ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते? अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे. पण मग घ्या ना, पोलीस फोर्स वापरुन करा. अहो वेळ लागणार मग… कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची. ठिकाय… ओके

हे ही वाचलं का?

Back to top button