केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल | पुढारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात पुण्यातील चतु:शुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे.

सोमवारी (दि.२३) रोजी एका झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावरून खालच्या पातळीची टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे.

मी जे बोललो ते गुन्हा नाहीच. आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहित नाही. तक्रारदार सुधाकर बुडगजरला मी ओळखत नाही.

उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात त्यावेळी गुन्हा होत नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे राणेंनी ठामपणे सांगितले. राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली तेव्हाच शिवसेना गेली, अशी टीका त्यांनी केली आहे. दिल्लीत देखील आमचे सरकार हे लक्षात ठेवा. बोलणाऱ्यांनी समोर यावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button