Covid-19 updates : सिंधुदुर्गला चौथ्या लाटेचा धोका नाही | पुढारी

Covid-19 updates : सिंधुदुर्गला चौथ्या लाटेचा धोका नाही

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी चौथी लाट येणाच्या धोका संभवत नाही. तरी खबरदारी म्हणून कोविड-19 नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर लसीचा दुसरा व बुस्टर डोस तातडीने पात्र नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आजार व लसीकरण आढावा बैठक झाली. या बैठकीस आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अति. जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यामध्ये 93 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर 83 टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूणर्र् झाला आहे. जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात पहिल्या 4 क्रमांकात असल्याचे सांगितले. जिल्ह्यात केवळ दोन टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोसचे प्रमाण वाढावे यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहिमेचे आयोजन करावे. त्याचबरोबर कोविड चाचण्याचेही प्रमाण वाढविण्यात यावे व कोविड बाबत जनजागृती करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले.

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आत्मे एकत्र आलेत – संजय राऊत यांची टीका | Pudhari Exclusive

Back to top button