अलमट्टीची उंची वाढवू नका; राजू शेट्टी यांची बोम्मई यांच्याकडे मागणी - पुढारी

अलमट्टीची उंची वाढवू नका; राजू शेट्टी यांची बोम्मई यांच्याकडे मागणी

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा: अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करून कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करावेत अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.

सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले आहे. महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिले.

त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

२००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर , सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलली असल्याचे जाणवते, असे शेट्टी म्हणाले. (राजू शेट्टी – बोम्मई  भेट)

बीड : सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

यवतमाळ : सारस पक्ष्याने पोखरलेला तलाव फुटला, शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

ते पुढे म्हणाले, ‘कृष्णा , दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर जे पूल बांधलेले आहेत.

त्या अनेक पुलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे.

महापूर काळामध्ये नदया पाञापासून दोन-दोन किलोमीटर पाणी पसरते.

अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते.

महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी.

बेळगाव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करावा,.

दोन्ही बाजूस दोन-दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहित होईल.

कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे सहा पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल  व भराव महापुरास कारणीभूत ठरत आहे.

चिकोडी तालुक्यांतील अंकली-मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले, चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे.

यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा,

वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली.

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पाच व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती?

अकोल्यात पावसाचे थैमान; पूरात ५० जनावरे वाहून गेली

शेट्टी यांना निमंत्रण

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यावर तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी केले जातील.

कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापूर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले आहेत.

हा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजू शेटटी यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले.

यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील, आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर व बेळगाव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: 

Back to top button