जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही अंतराळात जाण्यास सज्ज - पुढारी

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही अंतराळात जाण्यास सज्ज

न्यूयॉर्क : ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली? याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, बिग बँगपूर्वी अशी कोणतीही अवकाशीय वस्तू अस्तित्वात नव्हती. सर्वकाही एका बिंदूत कैद होते. मात्र, अचानक महास्फोट झाला आणि जग अस्तित्वात आले. महास्फोटानंतर सावकाशपणे ब्रह्मांड बनण्यास सुरुवात झाली. तसेच ते पसरण्याच्या प्रक्रियेसही वेग आला.

बिग बँगनंतर या आकाशगंगांची निर्मिती कशी झाली? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी आता जगातील सर्वात मोठी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ अंतराळात जाण्यास सज्ज झाली आहे. ही दुर्बीण अंतराळासंबंधीची असंख्य रहस्ये उलगड्यास मदत करेल, असे संशोधकांना वाटते. या टेलिस्कोपच्या निर्मितीस 9.7 बिलियन डॉलर्स इतका प्रचंड खर्च आला आहे.

‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणचे धुळीच्या ढगांमध्ये लपलेल्या तार्‍यानांही ही दुर्बीण पाहण्यास सक्षम आहे. याशिवाय दीर्घ अंतरावरून येणारे वेव्हलेंथलाही डिटेक्ट करण्यासही ती सक्षम आहे. या टेलिस्कोपला हबलचे ‘अपग्रेडेड व्हर्जन’ मानण्यात येत आहे.

‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या मदतीने तार्‍यांच्या जीवन चक्राबाबतही समजून घेणे सोपे होणार आहे. हे टेलिस्कोप येत्या 18 डिसेंबर 2021 रोजी लाँच करण्याची योजना ‘नासा’ तयार करत आहे. या दुर्बिणीच्या मदतीने अंतराळातील आतापर्यंत न पाहिलेले भाग पाहणे आता शक्य होईल.

Back to top button