UP Election : योगींच्या 'अब्बा जान' या वक्तव्यावर विरोधकांची सडकून टीका - पुढारी

UP Election : योगींच्या 'अब्बा जान' या वक्तव्यावर विरोधकांची सडकून टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीच्या (UP Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर विरोधी पक्षांचा चांगलाच निशाणा साधलेला आहे. कारण, १२ सप्टेंबर रोजी कुशीनगर येथील सभेत आदित्यनाथ म्हणाले होते की, “तुम्हाला रेशन मिळत आहे ना? तुम्हाला आजच्यासारखं २०१७ पूर्वी इतकं रेशन मिळतं होतं… कारण, त्यावेळी अब्बा जाने म्हणून घेणारे ते रेशन हजम करत होते.” योगीच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“स्वतःला अब्बा जान म्हणवणारे गरीबांच्या नोकरी डाका टाकत होते. संपूर्ण कुटुंब झोळी घेऊन बाहेर पडत होता आणि पूर्ण झोळी भरून वसूली करून येत होता”, असंही योगी आदित्यनाथांनी वक्तव्य केलं. ‘अब्बा जान’, ही टर्म समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरील टीका आहे.

यापूर्वी आदित्यनाथ (UP Election) म्हणाले होते की, “आम्ही सांगितलं होतं की, ‘रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’ आज अयोध्यामध्ये रामजन्मभूमीचे भव्य मंदीर निर्माण केलं जातं आहे. आम्ही १९९० मध्येही सांगितलं होतं की, जिथं रामलला विराजमान आहे, तिचं राम जन्मभूमी आहे. तिथंच भव्य मंदीर उभं निर्माण व्हायला पाहिजे. पण, या लोकांनी त्यावेळी हे स्वीकारलं नव्हतं. यांनी राम भक्तांवर गोळीबार केला.”

योगी आदित्यानाथांवर विरोधी पक्षाने केली टीका

काॅंग्रेसचे नेते कपील सिब्बल म्हणाले की, “अब्बा जान, यांसारख्या वक्तव्यावरून योगी आदित्यनाथ काय सांगू इच्छितात? एकत्र असणाऱ्या उत्तरप्रदेशात फूट पाडा आणि शासन करा?”

नॅशनव काॅन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला म्हणतात की, “मी नेहमीच सांगत आलो आहे की, मस्लिमांविरुद्ध विष ओकेणे, त्याचबरोबर जबरदस्त कट्टरतावाद आणि तिरस्कार, याशिवाय कोणत्याच मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवू इच्छित नाही.”

तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या महुओ मोइत्रा म्हणाल्या की, “भारतात लोकनियुक्त मुख्यमंत्री खुलेपणाने कट्टरतावाद पसरविण्याच्या आरोपाखाली कलम १५३ ए नुसार युपी पोलीस आणि सुप्रीम कोर्ट गुन्हा दाखल करू शकेल का?”

काॅंग्रेस प्रवक्ता सुरेंद्र राजपूत म्हणाले की, “योगीजी तुम्ही कितीही अब्बा जान, अम्मी जान, बीबी जीन, चाचा जान करा. पण, निवडणूक ही मूळ मुद्द्यांवरच होणार आहे. तुम्हीही काहीही करा, ही निवडणूक आम्ही सांप्रदायिक होऊ देणार नाही. हिंदू-मुस्लीम या मुद्द्यावर निवडणूक नाही होणार.”

“योगीजी तुम्हाला सांगावं लागेल की, ७० लाख रोजगार कुठे आहेत. तुम्हाला सांगावं लागेल की, महिला सुरक्षिततेत तुम्ही अयशस्वी का ठरलात. तुम्हाला सांगावं लागेल की, मोठंमोठे व्यापारी शेतकऱ्यांना आणि मजुरांची लुबाडणूक का करत आहेत”, असेही प्रश्न उपस्थित करून सुरेंद्र राजपूत यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली.

पहा व्हिडीओ : तळिये गावचा विध्वंस मांडला देखाव्यातून

Back to top button