औरंगाबाद : कन्नड येथे अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या आरोपीस अटक | पुढारी

औरंगाबाद : कन्नड येथे अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या आरोपीस अटक

कन्नड(औरंगाबाद),पुढारी वृत्‍तसेवा : शासनाने प्रतिबंधित केलेली औषधे नशेसाठी वापरण्यात येत असून या संदर्भात या औषधांचा व्यापार करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काजी मोहल्ला येथे शासनाने प्रतिबंधित केलेले औषधे नशा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत होते. शासनाने ही औषधी प्रतिबंधित केली आहेत. पोलिस पथकाने काजी मोहल्ला येथे छापा टाकून शेरखान नन्हे खान (वय 48) हा इसम प्लास्टिकच्या पिशवीत औषधे विकताना आढळून आला. त्याच्या जवळ रेक्सटक्स कफ सायरफच्या नऊ बाटल्या ज्याची किंमत अंदाजे रु.२७०० व अल्परेसाफी या गोळ्यांची पाच स्ट्रीप सापडले. तर याचा वापर नशेसाठी करण्यात येत होता.

युवक आणि अल्पवयीन विद्यार्थी देखील या प्रकारच्या नशा करत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये या गोळ्यांचा व औषधांचा वापर नशा करण्यासाठी करण्यात येत आहे. सदरील आरोपीने ही औषधे चाळीसगाव येथील युग मेडिकल येथून खरेदी केल्याचे कबूल केले. त्यावरून आरोपी शेर खान नन्हे खान यास अटक करण्यात आली आहे. तसेच चाळीसगाव येथील युग मेडिकलचे मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

रत्नागिरी: जांभरुण बौध्दवाडी येथे प्राणघातक हल्ला करणाऱ्यास ७ वर्ष सक्तमजुरी  

बीड : फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायकोवर अत्याचार 

नाशिक : छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

Back to top button