श्रीरामपूर : चंद्रकांत वाकचौरे : 'स्वच्छ श्रीरामपूर… सुंदर श्रीरामपूर'सह सर्वात मोठी अशी ओळख असलेल्या श्रीरामपूर नगर पालिकेच्या बहुप्रतीक्षेतील पंच वार्षिक निवडणुकीसाठी आज (सोमवारी) सकाळी आरक्षण सोडत जाहीर झाल्याने आगामी रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही दिग्गजांचे गड जैसे-थे शाबूत राहिले, तर काहींचे खालसा झाल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे. ओबीसी आरक्षणाविना या लढती होत असल्याने तब्बल 27 जागांवर खुल्या गटात पुरुष व महिला उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे.
नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वा. प्राधिकृत अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन चिमुकल्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढून आरक्षणाची घोषणा करण्यात आली.
श्रीरामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 34 सदस्य नगरसेवक होण्यास पात्र आहेत. 27 सदस्यांची सर्वसाधारण उमेदवार म्हणून जाहीर होणार आहे. यापैकी 50 टक्के आरक्षणानुसार 13 जागांवर स्त्री राखीव उमेदवारांसाठी सोडती काढण्यात आल्या. 34 पैकी उर्वरित 6 जागा अनुसूचितसाठी, तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी स्त्री राखीव आहे. अनुसूचितच्या निम्म्या अर्थात 3 जागा स्त्री राखीव आहेत.
दरम्यान, आरक्षण सोडतीनुसार प्रभाग 1 (अ) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. पूर्वी येथे अनुसूचित जाती महिला प्रणिती दीपक चव्हाण नगरसेविका होत्या, तर (ब) सर्व साधारणसाठी जैस-थे राहिला असून, तेथे राजेश अलघ निवडून आले होते. ते पुन्हा तब्बल चौथ्यांदा दावेदार असतील. प्र. 2 (अ) व (ब) अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारणसाठी जैसे-थे राहिला. येथे जयश्री विजय शेळके व श्यामलिंग शिंदे नगरसेवक होते. ते पुन्हा दावेदार आहेत. प्रभाग 3 अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला. येथे (अ) ओबीसी पुरुष मुक्तार शहा, तर (ब) सर्वसाधारणमधून हेमा रवींद्र गुलाटी निवडून आले होते. या दोघांना दुसरीकडून लढावे लागणार आहे.
प्रभाग 4 (अ) सर्वसाधारण महिला राखीव, तर (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला. येथे (अ)ओबीसमधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, तर (ब) जनरल महिला स्व. जहागीरदार नगरसेविका होत्या. येथे पोट निवडणुकीत रईस जहागिरदार यांच्या पत्नी निवडून आल्या होत्या. प्रभाग 5 (अ) व (ब) जैसे-थे राहिला. येथे प्रकाश ढोकणे व शीतल गवारे निवडून आले होते. प्रभाग 6 अनुसूचित जाती पुरुष व (ब) सर्वसाधारण महिला राखीव झाला. (अ) मध्ये पूर्वी अनुसूचित महिलेसाठी भाऊसाहेब डोळस यांच्या पत्नी, तर (ब) मध्ये स्व. बाळासाहेब गांगड निवडून आले होते. गांगड परिवाराला आता महिलेला उमेदवारी द्यावी लागेल.
प्रभाग 7 (अ) अनुसूचित जाती महिला तर (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला. येथे ओबीसीमधून माजी नगराध्यक्ष संजय फंड, तर (ब) ओबीसीमधून निलोफर महंमद शेख नगरसेवक होते. त्यांना अन्य प्रभागातून उमेदवारी करावी लागेल. प्रभाग 8 (अ) सर्वसाधारण महिला, तर (ब) सर्वसाधारण पुरुष जैसे-थे आहे. (अ) मधून मीराताई रोटे, तर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे निवडून आले होते. ससाणे येथे पुन्हा दावेदार असतील. प्रभाग 9 (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला आहे. प्रभाग 10 (अ) सर्वसाधारण महिला, तर (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला. येथे माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख सलग चौथ्यांदा जिंकले होते. (ब) ओबीसीमधून जायदाबी कलीम कुरेशी नगरसेविका होत्या. येथे अंजुमभाई शेख यांना अदलाबदल करावी लागेल. प्रभाग 11 अनुसूचित जाती पुरुष तर (ब) सर्वसाधारण महिला राखीव झाला. (अ) मध्ये समिना अंजुमभाई शेख नगरसेविका होत्या.त्यांना अन्यत्र लढावे लागेल.
प्रभाग 12 (अ) व (ब) सर्वसाधारण महिला व पुरुष राखीव झाला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार व काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांची कॉटे की टक्कर झाली होती. यात पवार जिंकले होते. माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्या आदेशानुसार छल्लारे यांनी हक्काचा प्रभाग 8 सोडून या प्रभागात लढले. आता मार्ग सुकर झाल्याने ते पुन्हा प्रभाग 8, 14 किंवा 15 मधून रणांगणात उतरू शकतात. (ब) सर्वसाधारण महिलामधून अल्तमश पटेल यांच्या पत्नी जिंकल्या होत्या. प्रभाग 13 (अ) अनुसूचित जमाती महिला, तर (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला आहे. (अ) सर्वसाधारण महिला राखीवमधून वैशाली दीपक चव्हाण, तर (ब) मधून माजी आ. पूत्र संतोष भाऊसाहेब कांबळे जिंकले होते. त्यांना आता गड बदलावा लागणार आहे. मुख्यत्वे 34 पैकी 27 जागा खुल्या आहेत. 14 ते 17 हे प्रभाग अनुक्रमे सलग सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत.
प्रभाग 10 (अ) सर्वसाधारण महिला तर (ब) सर्वसाधारण पुरुष राखीव झाला. येथून माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख सलग चौथ्यांदा निवडून आले होते. अंजुमभाई शेख यांना अदलाबदल करावी लागेल.
प्रभाग 12 (अ) व (ब) सर्वसाधारण महिला व पुरुष राखीव झाला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार व काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांची कॉटे की टक्कर झाली होती. यात पवार जिंकले होते. माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्या आदेशानुसार छल्लारे यांनी हक्काचा प्रभाग 8 सोडून या प्रभागातून निवडणूक लढविली होती. आता मार्ग मोकळा झाल्याने ते पुन्हा प्रभाग 8, 14 किंवा 15 मधून लढू शकतात.
प्रभाग 14 (ब) भारतीताई परदेशी, प्रभाग 15 (ब) माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, प्रभाग 16 (ब) रवी पाटील व प्रभाग 17 (अ) मधील स्नेहल खोरे यांचे किल्ले सहिसलामत राहिले आहेत. प्रभाग 17 (ब) मध्ये मंजुश्री मुरकुटे, सुभाष जंगले व मनोज लबडे यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. यात लबडे यांनी बाजी मारली होती. येथे आता केतन खोरे रणांगणात उतरु शकतात.
प्रभाग 8 (अ) सर्वसाधारण महिला, तर (ब) सर्वसाधारण पुरुष जैसे- थे राहिला आहे. येथे (अ) मधून मीराताई रोटे, तर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे निवडून आले होते. ससाणे येथे पुन्हा दावेदार असतील.