पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध जिव्हाळ्याचे : संजय राऊत | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध जिव्हाळ्याचे : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. आमच्या नात्यामध्ये कधी राजकीय भांडण आणलेलं नाही. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी एकमेकांचा आदर करतात, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. राऊत हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहूगावातील शिळामंदिर लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पर्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नेहमी निशाण्यावर असलेल्या पंतप्रधानांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत ४२ मतांच्या कोट्यावर उभा राहिलो अशी हिमंत विरोधकांमध्ये नाही. विरोधकांना राज्याचं चांगलं पाहवतं नाही. राज्यसभेतील मतमोजणी पद्धतीनुसार आमचा पराभव झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

दीड वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक पदभरती करण्याचे मोदी यांच्या आदेशाचे त्यांनी कौतुक केले आहे. १० लाख नोकऱ्यांपैकी काही नोकऱ्या महाराष्ट्रात येत असतील तर त्यांच स्वागत असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button