Crime News : मुलीस पळवून नेण्यास मदत करणारा मित्र जेरबंद | पुढारी

Crime News : मुलीस पळवून नेण्यास मदत करणारा मित्र जेरबंद

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीस पळवून नेवून लग्नाच्या अमिषाने तिच्याशी अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी मदत करणार्‍या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. विकास नामदेव बर्डे (20 रा.राहुरी खुर्द) असे या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असताना राहुरी पोलिसांनी अशा गुन्ह्यात मदत करणार्‍यावर कठोर कारवाईसाठी पुढाकार घेतल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. राहुरी पोलिस ठाण्यात 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पो. नि. ठेंगे यांनी मुलींच्या अपहरणाचे वाढते प्रकार लक्षात घेता अशा गुन्ह्यात मदत करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलास मदत करणार्‍या आईविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍याचा दिवशी आणखी एका अल्पवयीन मुलीस पळवू नेल्यास मदत करणारा विकास बर्डे यास अटक केल्याचे पो. नि. ठेंगे यांनी सांगितले.

Back to top button