मोदींच्या मार्गदर्शनाखाली विकास सुरू आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

मोदींच्या मार्गदर्शनाखाली विकास सुरू आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढारी वृत्तसेवा :  शिर्डीतील दर्शनानंतर पंतप्रधान मोदींची सभा सुरू झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात ते म्हणतात, महाराष्ट्र ही भक्ती, शक्तीची भूमी आहे. ‘सबका मालिक एक’ या साईबाबांच्या संदेशानुसार पंतप्रधान मोदी हे ‘सबका साथ सबका विकास’ या प्रेरणातून काम करत आहेत. राष्ट्र बळकटीकरणासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पाणी, रेल्वे प्रकल्प, साईबाबांच्या भक्तांना सुविधा देणारे प्रकल्प उद्घाटन झाले. शेतकर्‍यांना केंद्रातील मोदी सरकारने 500 रुपये देण्याचा निर्णय, शिंदे सरकारने 500 असे 12 हजार रुपये शेतकर्‍यांना वर्षाला देण्याचा निर्णय घेतला. सरकार म्हणून आम्ही देत असलो तरी शेतकर्‍यांनी कष्टातून पिकविलेल्या मालाला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रही त्याच वाटेवर वाटचाल करत आहे. यापुढेही मोदींच्या मार्गदर्शनाखाली विकास करण्याचा निश्चिय केला आहे.

 

Back to top button