पाथर्डी : गैरकारभार उघड होण्याच्या भीतीने विरोधक अस्वस्थ : आ. प्राजक्त तनपुरे | पुढारी

पाथर्डी : गैरकारभार उघड होण्याच्या भीतीने विरोधक अस्वस्थ : आ. प्राजक्त तनपुरे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : मागील पाच वर्षात पाथर्डी बाजार समितीत अडीच कोटींची विकास कामे झाली, तसेच 18 वर्षे तोट्यातील या संस्थेला 51 लाख रुपयांचा नफा मिळवून दिला, गैर कारभार रोखून संस्थेला शिस्त लावली. त्यामुळे या निवडणुकीत ही संस्था प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली द्या. गैरकारभार उघड होण्याच्या भीतीने विरोधक अस्वस्थ आहेत, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. लोहसर येथे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवशंकर राजळ, किरण शेटे, बंडू बोरूडे, भगवानराव दराडे, सिताराम बोरूडे, राजेंद्र मस्के, पोपट आव्हाड, अजय पाठक, उद्धव दुशिंग, रफिक शेख, विजय पालवे, राहुल गवळी आदी उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले, पाथर्डीची बाजार समिती जवळपास 20 वर्षे विरोधकांच्या ताब्यात होती. अनेक गैरप्रकार समितीत झाले.

2017 मध्ये मतदारांनी प्रताप ढाकणेच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला सत्ता ताब्यात आल्यानंतर पहिली दीड वर्षे मागील सत्ताधार्‍यांचा कारभार तपासण्यात गेला. जवळपास 15 लाख रुपये तोट्यात ही संस्था होती. आज 51 लाख रुपये नफ्यात आणली. नगरच्या बाजार समितीचे भूखंड खोके आणि पेट्या घेऊन कसे वाटले गेले लवकरच आपण उघड करणार आहोत, असे आमदार तनपुरे म्हणाले.

‘वृद्धेश्वर’बाबतही थोडे बोलावे : ढाकणे
प्रताप ढाकणे म्हणाले, विरोधक आमच्यावर बाजार समिती भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. 20 वर्षे शेतकर्‍यांची ही संस्था कशा प्रकारे लुटली आपण लवकरच सिद्ध करू. तसेच, ताळेबंद तपासावा आणि नंतर बोलावे, सहकारी संस्था कशा चालवाव्यात हे आम्हाला शिकवणार, त्यांनी वृद्धेश्वर कारखान्याबाबतही थोडे बोलावे, असे त्यांनी केली.

Back to top button