नगर : पाथर्डी बाजार समिती निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल | पुढारी

नगर : पाथर्डी बाजार समिती निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शुक्रवारपर्यंत (दि.31) एकूण 153 अर्जांची विक्री झाली आहे.
दाखल उमेदवारी अर्ज – सहकारी सेवा संस्था सर्वसाधारण प्रवर्ग – 14, इतर मागास प्रवर्ग -2, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग – 2, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्ग – 6, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 1, आर्थिक दुर्बल प्रवर्ग – 1, व्यापारी-आडते मतदारसंघ 6, हमाल-मापाडी संघ – 2, असे एकूण 34 अर्ज दाखल झाले आहेत.

पाथर्डी बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राजळे -ढाकणे गट परस्परांविरुद्ध भिडणार आहेत. दोन्ही गटांकडून बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनीही निवडणूक संदर्भात आपली भूमिका मांडून समविचारी पक्षाशी आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले आहे. सोमवारपासून (दि.27) 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारपर्यंत 153 अर्जाची विक्री, तर इच्छुक उमेदवारांचे 34 अर्ज दाखल झाले आहे. 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकारी सुनील खर्डे हे असून, मदतनीस म्हणून योगेश नरसिंगपूरकर हे काम पाहत आहेत.

 

Back to top button