नगर : स्थायी समिती सभापतीपदी गणेश कवडे बिनविरोध | पुढारी

नगर : स्थायी समिती सभापतीपदी गणेश कवडे बिनविरोध

नगर : पुढारी वृत्तसेवा : स्थायी समितीच्या सभापतीपदी नगरसेवक गणेश कवडे (ठाकरे गट) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभापती पदासाठी गणेश कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. दरम्यान, सभागृह नेतेपदी विनीत पाऊलबुध्दे यांची निवड केल्याचे पत्र महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले.

स्थायी समिती सभापती निवडीसाठी सकाळी 11 वाजता सभा सुरू झाली. या सभेला स्थायी समिती सदस्य नगरसेवक संपत बारस्कर, प्रदीप परदेशी, नजीर शेख, सुनील त्रिंबके, पल्लवी जाधव, सुवर्ण गेनप्पा, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. सभापती पदासाठी गणेश कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिका-यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर सभापती गणेश कवडे यांनी ढोल- ताशाच्या गजरात महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, श्याम नळकांडे, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना व कवडे समर्थकांनी गर्दी केली होती.

सभागृहनेतेपदी विनीत पाऊलबुद्धे
शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने स्थायी समिती सभापती पद शिवसेनेला दिले तर सभागृहनेतेपद राष्ट्रवादीला मिळाले. महापौर रोहिणी शेंडगे यांनी विनीत पाऊलबुद्धे यांना सभागृह नेतेपदाचे अधिकृत पत्र दिले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेवक अविनाश घुले, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button