राहुरीतील ‘त्या’ शिक्षकाचे अखेर झाले निलंबन! | पुढारी

राहुरीतील ‘त्या’ शिक्षकाचे अखेर झाले निलंबन!

नगर; पुढारी वृत्तसेवा : सहलीला नेलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन करणार्‍या राहुरी तालुक्यातील शिक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन यांनी ही माहिती दिली. याबाबतची माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका शाळेची काही दिवसांपूर्वीच मुंबई परिसरात शैक्षणिक सहल गेली होती. मात्र सहलीला असताना शिक्षक किरण रोकडे यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला होता. सहलीहून परतल्यानंतर हे प्रकरण चिघळले.

पालकांसह ग्रामस्थांनी राहुरी पंचायत समितीत ठिय्या देवून संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी केली.गटशिक्षणाधिकारी नजन यांनी याप्रकरणाची तत्काळ दखल घेत चौकशी सुरू केली. याप्रकरणाचा तसा अहवालही जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला होता. त्यामुळे या शिक्षकावर काय कारवाई होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर दोन दिवसांपूर्वीच संबंधित शिक्षक रोकडे याचे निलंबनाचा आदेश झाला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नजन यांनी दिली आहे. रोकडे यांचे मुख्यालय आता कर्जत येथे करण्यात आले आहे.

 

Back to top button