नगर जिल्ह्यात 36 लाख साखर पोत्यांचे उत्पादन | पुढारी

नगर जिल्ह्यात 36 लाख साखर पोत्यांचे उत्पादन

कोपरगांव : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 21 डिसेंबरपर्यंत 41 लाख 39 हजार 935 मे. टन उसाचे गाळप करून त्यापासून 35 लाख 89 हजार 300 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. दैनंदिन साखर उतारा 10.85 असा आहे.
जिल्हयातील साखर कारखान्यांचे गाळप मे. टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणेः अंबालिका- (6 लाख 44 हजार 885 मे.टन) (6 लाख 19 हजार 600 साखर पोते निर्मिती). (10.30 साखर उतारा), मुळा- (4,31,660) (2,95,000), (10.15), स. म. भाऊसाहेब थोरात- (3,99,790) (4,20,220), (12.60), ज्ञानेश्वर- (4,26,750) (3,68,850) (10.90), स. म. नागवडे श्रीगोंदा- (3,02,410) (2,75,100), (10.36), पदमश्री विखे पाटील- (3,16,300) (2,36,300), (11.10), कुकडी- (2,21,250) (1,77,750), (10.20), अशोक- (2,16,830) (2,03,250) (11.54), स. म. शंकरराव कोल्हे- (2,21,155) (1,73,600) वृध्देश्वर- (1,57,485) (1,45,100), अगस्ती- (1,60,138) (1,56,180), (10.57), केदारेश्वर- (1,48,830) (1,20,400). (10.51), कर्मवीर शंकरराव काळे- (1,41,492) (1,40,900), (11.31), मुळा -(4,31,660)(2,95,000) (10.15), गंगामाई- (3,11,200) (2,22,700) (10.92), गणेश- (39,750)(34,350) (10.71)याप्रमाणे गळीत झाले आहे.

राज्यात 92 खाजगी आणि 99 सहकारी साखर कारखान्यांनी चालू वर्षी गळीत हंगाम सुरू केलेला आहे त्यांनी 15 डिसेंबर पर्यंत 3 कोटी 40 लाख में टन उसाचे गाळप करून त्यापासून 2 कोटी 68 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर राज्याचा सरासरी साखर उतारा 8.94 टक्के आहे. राज्यात 11 लाख उसतोडणी कामगारांमार्फत उसतोडणी सुरू आहे. त्यांच्या दिमतीला यंदा हार्वेस्टर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. गेल्या तीन वर्षापासून चांगले पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे झुकला आहे. उसाच्या नवनवीन जाती विकसीत होत असून त्याप्रमाणात शेतकरी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क करून कुठला ऊस लावला म्हणजे अधिक उत्पादन मिळेल, याची खातरजमा करू लागले आहेत. बहुतांष साखर कारखाने कोईमतूर, वसंतदादा शुगर इन्सिस्टीयुट यांच्याकडून जादा उत्पादन देणारे उसाचे बेणे आणून ते शेतकर्‍यांच्या थेट बांधावर देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आता उसाला प्राधान्य देत आहेत.

उसाचे उत्पादन मोठया प्रमाणात होवू लागल्याने जो कारखाना प्रथम प्राधान्याने ऊस तोडून नेईल, त्याला शेतकर्‍यांची अधिक पसंती आहे. मात्र सहकारी सोसायट्या, विविध बँका, पतसंस्था यांचे कर्ज वसुल होण्यात अडचणी येवू लागल्या आहेत. कारण शेतकरी कर्ज एका संस्थेकडून उचलतात आणि दुर्‍याच कारखान्यांना ऊस देत आहे.

इथेनॉल प्रकल्पासाठी 18 हजार कोटी

काही कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. केंद्र शासनाने 288 प्रकल्पांना 18 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. इथेनॉल उत्पादनाचा कारखान्यांना एफआरपी देताना फायदा होऊ लागला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने विविध राज्यातून याबाबत सातत्याने मागणीचा दबाव वाढू लागल्याने केंद्र व राज्य शासन जास्तीचा मोबदला देण्यासाठी मार्गदर्शक सूचना लागू करणार आहेत. हवामान बदल आणि इथेनॉल उत्पादनामुळे महाराष्ट्र राज्यात साखरेचे उत्पादन यंदा 117 लाख टनापर्यंत होईल, असा अंदाज आहे.

Back to top button