आंध्रच्या तिघांना पकड वॉरंट, गुन्ह्यातून वगळण्याच्या अर्जावर येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी | पुढारी

आंध्रच्या तिघांना पकड वॉरंट, गुन्ह्यातून वगळण्याच्या अर्जावर येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

नगरः पुढारी वृत्तसेवा :  रेखा जरे खून खटल्यातील आरोपी बाळ बोठे याला फरार असताना कोणतीही मदत केली नसून, त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्याच्या मागणीचा अर्ज करणार्‍या आंध्रप्रदेशातील तीन आरोपींना न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरंट जारी केले आहे. तसेच, गुन्ह्यातून वगळण्याच्या अर्जावर येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. आंध्र प्रदेश) अशी पकड वॉरंट जारी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुनावणीला आरोपी गैरहजर राहत असल्याने आरोपींवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सरकार पक्षातर्फे आरोपींविरूद्ध पकड वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. शुक्रवारी (दि.3) न्यायालयाने गुन्ह्यातून वगळण्याची मागणी केलेल्या तिन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र पकड वॉरंट जारी केले आहेत. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.

Back to top button