समनापूर बायपासवर टेम्पोत 2 लाखांचे गोमांस पकडले | पुढारी

समनापूर बायपासवर टेम्पोत 2 लाखांचे गोमांस पकडले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: शहरालगत समनापूर बायपासवर शहर पोलिसांनी संशयास्पद टेम्पोतून सुमारे 2 लाख रुपयांचे गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पाड व्याच्या दिवशी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोतून गोमांस वाहतूक केली जात असल्याबाबतची माहिती खबर्‍याच्या मार्फत पो. नि. राजेंद्र देशमुख यांना मिळाली माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने शहरालगतच्या समनापूर बायपासवर सापळा लावला.

सापळ्यात संशयास्पद टेम्पो अडकला. त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे 2 लाखाचे गोमांस पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी टेम्पो आणि मांस ताब्यात घेतले असून याबाबत पो. कॉ. एकनाथ खाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस शाबान अली हुकूम अली शहा रा. गोवंडी, मुंबई) व तोहिद दोस्त मोहम्मद पठाण ( रा.आळे, ता जुन्नर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, गोमांस पकडण्याचे प्रकार थांबत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Back to top button