वाळकी : माजी पंचायत समिती सदस्याच्या घरी चोरी | पुढारी

वाळकी : माजी पंचायत समिती सदस्याच्या घरी चोरी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका पंचायत समितीच्या माजी सदस्याच्या घरी तीन ते चार चोरट्यांनी घरातील कुटुंबियांना लोखंडी रॉडने मारहाण केली. सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.27) पहाटे रुईछत्तीशी गावच्या शिवारात घडली.  रुईछत्तीशी ते वडगाव तांदळी रस्त्यावर गावापसून अर्ध्या किमी अंतरावर नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब दरंदले यांचे घर आहे. मंगळवारी (दि.27) पहाटे 2.30च्या सुमारास पत्नी, दोन मुली, असे सर्व जण घरात झोपले होते. याचवेळी तीन ते चार चोरट्यांनी त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा व लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत दरंदले यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

यानंतर त्यांच्या पत्नीला ही मारहाण करत त्यांच्या व मुलींच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. घरातील रोख रक्कम घेऊन सर्वांना एका बेडरूममध्ये कोंडून तेथून पोबारा केला. यावेळी चोरट्यांनी सोन्याचे दागिने व कपाटातील पर्समध्ये ठेवलेली रोकड, असा 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. यानंतर दरंदले यांनी त्यांचा पुतण्या बलभीम दरंदले व शेजारी अशोक काळे यांना फोन करून बोलावून घेतले. ते आल्यावर त्यांनी सर्वांना बेडरूमच्या बाहेर काढले.

 

Back to top button