नगर : धनगर समाज वसतिगृहासह 12 योजनांना मंजुरी | पुढारी

नगर : धनगर समाज वसतिगृहासह 12 योजनांना मंजुरी

निघोज, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतिगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर 12 योजनांना मंजुरी दिल्याचा आदेश काढला असल्यांची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.

महादेव जानकर म्हणाले, धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमल बजावणी व्हावी ही समाजाची मुख्य मागणी आहे; मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्याने आम्ही समाजाची प्रगती होण्यासाठी एसटीच्या सवलती लागू करण्यांची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

या मागणीसाठी भाजप- सेना सरकारमध्ये मंत्री असताना धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासह आदिवासी समाजाप्रमाणे सोई सुविधा मिळाव्यात म्हणून योजनांचा प्रस्ताव सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन तयार केला होता. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आल्याने त्यांनी या प्रस्तावाचा शासन आदेश काढला नाही. राज्यात नव्यांने शिंदे फडणवीस सरकार आल्याने त्यांच्याकडे योजनांच्या अंमल बजावणीची मागणी केली. त्यांनी तत्काळ आदेश देत शासन निर्णय काढल्याने त्यांचे आभार जानकर यांनी मानले.

उच्च शिक्षणासाठी मुलांच्या वसतिगृहासाठी मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागा प्रत्येक विभागात देण्यात आल्या. प्रत्येक विभाग, त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरावर वसतिगृह असावेत, अशी समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने खालील 12 योजनांचा शासन आदेश काढला.

Back to top button