राहुरी : मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाची विश्रांती | पुढारी

राहुरी : मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाची विश्रांती

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्रावर पावसाने उघडीप दिली आहे. धरणाकडे होणरी नवीन पाण्याची आवक कमी झाली आहे. 10 हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग कमी होऊन 2 हजार 500 क्युसेकने पाणी जायकवाडीच्या वाहत आहे. आवक 4 हजार 24 क्युसेक इतकी असून 25 हजार 158 दलघफू इतका स्थिर ठेवण्यात आला आहे. मुळा धरणावर पर्यटकांची एकच झुंबड उडत आहे. धरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडणारे दुधाळ पाण्याचे तयार होणारे तुषार अंगावर घेण्यासाठी तरुणाई धरण स्थळी दाखल होत आहे. दरम्यान, मुळा धरणातून 124 ऑगस्ट रोजी सोडलेला विसर्ग सुरूच आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 10 हजार क्युसेकपर्यंत वाढ झालेला विसर्ग घटविण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने थांबा घेतला. परिणामी नवीन पाण्याची आवक मंदावत आहे. 10 ते 12 हजार क्युसेकने होणारी नवीन पाण्याची आवक 4 हजार क्युसेकपर्यंत घसरली आहे. काल गुरुवारी (दि. 18) रोजी सायंकाळी 6 वाजता धरणाकडे 4 हजार 24 क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती.
धरणाच्या सर्व अकरा दरवाजातून गुरुवारी दुपारी विसर्ग कमी करीत 3 वाजता 2 हजार 500 क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावत होते, तर उजवा कालव्याद्वारे 500, तर डावा कालव्याने 120 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत.

Back to top button