पारनेरच्या विकासासाठी प्रयत्नशील; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

पारनेरच्या विकासासाठी प्रयत्नशील; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर; पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील विकासात्मक कामांसाठी सुजित झावरे यांना ताकद देणार आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून पारनेर तालुक्याला योग्य तो न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. त्याबद्दल लोणी प्रवरा येथे जाऊन पारनेर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व त्यांच्या सहकार्‍यांनी मंत्री विखे यांचा सत्कार केला.

यावेळी झावरे यांनी पारनेर तालुक्यातील विकास कामांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केली. तालुक्यातील विविध प्रश्न व समस्या यावेळी विखे यांच्यासमोर मांडल्या. झावरे म्हणाले, मंत्री विखे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून, तालुक्यात जास्तीत जास्त निधी उपलब्ध होण्यासाठी यापुढील काळात पाठपुरावा करणार आहे. देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच पारनेर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

 

Back to top button