नगर : ‘दिव्यांगांसाठी रुग्णालयात प्रतीक्षा कक्ष उभा करावा’ | पुढारी

नगर : ‘दिव्यांगांसाठी रुग्णालयात प्रतीक्षा कक्ष उभा करावा’

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून दिव्यांग येत असतात. तेथे त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दिव्यांगासाठी प्रतीक्षा कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली.

निवेदनात म्हटले, नगर जिल्ह्यातून अनेक दिव्यांग बंधू-भगिनी खेड्यापाड्यातून बुधवार या दिवशी दिव्यांग प्रमाणपत्र व तपासणीसाठी येत असतात. त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. दिव्यांग रुग्णालयाच्या आवारात कोठेतरी बाहेर व उघड्यावर बसून जेवण, आराम करत असतात. हे सर्व पाहून मनस्वी वाईट वाटते. आम्ही देखील त्याच प्रवाहाचे घटक आहोत.

आम्हालाही काही चांगल्या सुविधा दिल्या तर आम्हालाही आमच्या जीवनाचा अर्थ कळेल. दिव्यांग बांधवांना रुग्णालयांच्या आवारात प्रतीक्षा कक्ष उपलब्ध करून द्यावा. यावेळी राजेंद्र पोकळे, मधुकर घाडगे, संदेश रपारिया, किशोर सूर्यवंशी, सरला मोहोळकर, संजय पुंड, हमीद शेख, पोपट शेळके आदींनी केली आहे.

Back to top button