नगर : पारनेरचा पाणीप्रश्न मीच सोडवणार : आमदार लंके | पुढारी

नगर : पारनेरचा पाणीप्रश्न मीच सोडवणार : आमदार लंके

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून पारनेरचे अनोखे रूप माझ्या नजरेसमोर आहे. मी ध्येयवादी माणूस असून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पारनेर शहरात सुसज्ज उद्यान, क्रीडांगण, व्यापारी संकुल, बाजारपेठ, मुख्य रस्त्यांचे सुशोभिकरण व पारनेरचा पायाभूत विकास आराखडा तयार करण्यासाठी मी जातीने लक्ष घालणार आहे. पारनेरचा पाणीप्रश्न मीच सोडवणार, असे शाश्वत आश्वासन आमदार लंके यांनी दिले.

राजकीय सूडबुद्धीने अडचणी दुर्लक्षित

पारनेर शहरात विविध विकास कामांना प्रारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते पार पाडला. पारनेरचे ग्रामदेवत भैरवनाथाच्या मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. ते म्हणाले की, सरकार कुठलेही असुद्या. पारनेर शहराला मी निधी कमी पडू देणार नाही. पारनेर शहरातील विविध नागरी सुविधा राजकीय सूडबुद्धीने दुर्लक्षित झाल्या आहेत.

यावेळी नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई भालेकर, सभापती योगेश मते, विद्या कावरे, नितीन अडसूळ, प्रियंका औटी, अशोक चेडे, नीता औटी, सुप्रिया शिंदे, भूषण शेलार, हिमानी नगरे, श्रीकांत चौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, माजी सभापती गंगाराम बेलकर आदींसह मान्यवर, नागरीक मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्घाटन व लोकार्पण करण्यात आलेल्या कामांमध्ये चंद्रकांत गायकवाड ते आंबेडकर चौक भुयारी गटार (3,66,550), काकडे सर ते जुनी पंचायत समिती परिसर पेव्हिंग ब्लॉक बसविणे (4,55,479) शेळके सर ते लोणी रोड भुयारी गटार (3,66,550) खंडोबा मंदिर, भैरवनाथ गल्ली पेव्हिंग ब्लॉक बसविणे (3,50,000) कोल्हे वकील ते लोणी रोड भुयारी गटार (3,66,550), सतीश कासार ते लोणी रोड भुयारी गटार(3,66,550), नरेश साळवे ते लोणी रोड भुयारी गटार (3,66,550), शब्बीर शेख ते वरची वेस भुयारी गटार (7,44,698), अब्बास अत्तार ते सुलाबाई शेलार यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण (2,08,798), जामगाव रस्ता ते औटी वाडा रस्ता काँक्रिटीकरण (8,33,431), रेपाळे सर रस्ता ते बर्वे सर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण (11,49,862), बुगेवाडी शाळा खोल्या (17,50,000) या कामांचा समावेश आहे.

विरोधक कशा अडचणी निर्माण करतात, यावर अर्जुन भालेकर यांनी टीका केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय औटी यांनी विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांवर संवाद साधला. प्रास्ताविक डॉ. कावरे यांनी केले. विजय डोळ यांनी सूत्रसंचालन केले, तर सभापती योगेश मते यांनी आभार मानले.

Back to top button