नगर : हर घर तिरंगा कार्यक्रम यशस्वी राबवा : माणिक खेडकर | पुढारी

नगर : हर घर तिरंगा कार्यक्रम यशस्वी राबवा : माणिक खेडकर

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या वर्षातील प्रत्येक क्षण नवीन पिढीसाठी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा असून, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 9 ते 15 ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले. आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.

यावेळी खेडकर बोलत होते. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकूळ दौंड, डॉ. मृत्युंजय गर्जे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, काकासाहेब शिंदे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, रवींद्र वायकर,विष्णूपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, प्रवीण राजगुरू, भगवान साठे, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, मनीषा घुले, रमेश गोरे, नामदेव लबडे, बबन बुचकुल, सुनील ओव्हळ, सुनील परदेशी, भगवान आव्हाड, नारायण पालवे, नितीन एडके, महादेव जायभाये, प्रा. रमेश काटे, प्रमोद भांडकर आदी उपस्थित होते.

खेडकर म्हणाले की, हर घर तिरंगा कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गिते, तिरंगा यात्रा, मेळावे, सार्वजनिक ठिकाणी फलक लावावेत, प्रभातफेरी काढावी, सर्व निवासी संघटना, युवा संघटना, साधू-संताचे मठ व इतर सामाजिक संघटनाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकावा. प्रास्ताविक अजय भंडारी यांनी, सूत्रसंचालन सचिन वायकर, तर आभार सचिन पाटसकर यांनी मानले. बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांना पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने श्रद्धांंजली वाहण्यात आली.

अभिनंदनाचे ठराव
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचा, तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार व जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय, ओबीसी आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

आमदार राजळे यांना मंत्रिपद देण्यासाठी ठराव
ज्येष्ठ नेते अशोक चोरमले म्हणाले की, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघ 1995 पासून म्हणजे 27 वर्षांपासून मंत्रिपदापासून वंचित आहे. आमदार मोनिका राजळे यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदामुळे नगर जिल्ह्याचा अभ्यास आहे. भाजपच्या आमदार म्हणून त्यांची दुसरी टर्म आहे. विकासकामे व प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात त्यांचा फायदा होईल, असे सांगत आमदार राजळे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी, असा ठराव मांडला. त्यास अभय आव्हाड, गोकूळ दौंड, धनंजय बडे, पुरुषोत्तम आठरे, मंगल कोकाटे, अजय भंडारी, महादेव जायभाये, सचिन वायकर यांनी अनुमोदन दिले. एकमताने ठराव मंजूर झाला.

Back to top button