नगर : खडकीत गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त | पुढारी

नगर : खडकीत गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील खडकी परिसरातील दोन गावठी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापे टाकत सुमारे 31 हजार रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन जप्त करून ते नष्ट केले. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार आर.एस. खेडकर, गांगर्डे, लबडे, इथापे, महिला हवालदार हरिश्चंद्रे, कॉन्स्टेबल खिळे आदींच्या पथकाने शनिवारी (दि.23) सायंकाळी ही कारवाई केली आहे.

पथकाने खडकी शिवारात पवार वस्तीवर अशोक विश्वनाथ पवार याच्या घराच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून 20 हजार रुपयांची 400 लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 1 हजार रुपये किमतीची 10 लिटर तयार दारू पकली. दुसरा छापा सारोळा कासार शिवारात संजय सूर्यभान पवार (रा. खडकी, ता. नगर) याच्या गावठी दारू अड्ड्यावर टाकण्यात आला. त्या ठिकाणी 10 हजार किमतीचे 200 लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त केले. या प्रकरणी कॉन्स्टेबल खिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक विश्वनाथ पवार व संजय सूर्यभान पवार यांच्यावर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button