नगर : विजेचा धक्का बसल्याने उपसरपंचाचा मृत्यू | पुढारी

नगर : विजेचा धक्का बसल्याने उपसरपंचाचा मृत्यू

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पठार भागातील पिंपळगाव देपा येथील उपसरपंच प्रदीप गवराम गुंड (वय 33) यांचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव देप्यासह पठार भागात हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपळगाव देपाचे उपसरपंच प्रदीप गुंड काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब तेथील इतरांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ प्रदीप गुंड यांना तातडीने संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

उपसरपंच प्रदीप गुंड यांचे पठार भागात मोठे सामाजिक काम होते. त्यांना विजेचा धक्का बसल्याची बातमी कळताच त्यांच्या घरी मोठी गर्दी झाली. स्व. गुंड त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने पिंपळगाव देप्यासह पठार भागात हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या वरूणराजा संततधार बरसत असल्याने वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते.

Back to top button