नगर : नव्वदीतही पाऊले चालती पंढरीची वाट! | पुढारी

नगर : नव्वदीतही पाऊले चालती पंढरीची वाट!

खरवंडी कासार : कृष्णनाथ अंदुरे : वयाची नव्वदी पार केली, तरीही चालती पंढरीची वाट, भगवानगडाच्या तीनही संताच्या कालखंडापासून आषाढी वारी करणार्‍या एक महिला आणि पुरुष आजही भगवानबाबा पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर वारी भक्तीमधील शक्तीचा प्रत्यय येतो.

ससांरातील काम, धंदा व सुखदुखाःमध्ये वयाची नव्वदी पार केली. आतापर्यंत उन असो की, वारा पालखी सोहळ्यात कधीही खंड पडला नाही. मात्रल कोरोना काळातील अपवाद वगळता संत भगवानबाबांच्या पढंरपूर आषाढी पालखी सोहळया सोबत जात आजही वारीतील आनंद लुटत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील अंबोरा (ता.मंठा) गावातील वामन महाराज भोसले यांचे वडील संत भगवानबाबांबरोबर दिंडीत जात होते. वडील थकल्यानतंर वामन महाराज भोसले यांनी भगवानबाबांबरोबर वारीत जाणे सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत ते अविरीत सुरू आहे. अंबोरा गावातील दिंडी भगवान गडावर येते आणि ही दिंडी गडावर आल्यानतंर भगवान गडाची पालखी प्रस्थान ठेवते, अशी परंपरा भगवानबाबांपासून चालत आली आहे.

भगवानबाबा, भीमसिंह महारात व आता महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्यासोबत त्या वारीत सहभागी झाल्या आहेत. लमाण (बंजारा) समाज्याचा असणारा पारंमपारिक पोषाख, केसांना बांधलेले गोंडे, घागर्‍यावर जडवलेले आरसे, जुणे नाणे, अशा पोषखात दगडाबाई दिंडीत चालत आहेत. अक्षरांची ओळख नसतानाही त्या बंजारा, लमाणी भाषेत विठ्ठल नामाचा महिमा व संत भगवानबाबांचा महिमा सागूं जनमाणसात भक्ती भाव जागृत करतात. आज वय वाढले असले, तरी दगडाबाई व वामण महाराज भोसले यांचा उत्साह वाखन्या जोगा आहे.

दगडाबाई सांगळे

महिला वारकरी

नव्वदीतील महिला वारकरी दगडाबाई सांगळे या भगवान गडाच्या पायथ्याला असलेल्या नागालवाडी लमाणतांडाच्या रहिवाशी आहेत. त्या लमाण समाजातील महिला वारकरी आहेत. त्या लहानपणीच भगवानबाबांच्या सानिध्यात आल्या आणि बाबांच्या हाताने तुळशीची माळ गळ्यात घातली अन् वारकरी झाल्या.

Back to top button