घोडेगाव : विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : गडाख | पुढारी

घोडेगाव : विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : गडाख

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी रस्त्यांबरोबरच विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या विकास कामे जोरात सुरू आहेत. चांदा परिसरातील रस्त्यासह विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या निधीतील चांदा-मिरी या 15 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन गडाख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्या पार्वतीबाई कारभारी जावळे यांच्या निधीतील श्री महालक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर येथे पेव्हिग ब्लॉक, विविध रस्त्यांमधील सिमेंट पाईप, विविध वाड्या-वस्त्यांवर सौरपंप बसविणे आदी कामे, तसेच चांदा ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातील 13 अंगणवाडीतील मुलांना खेळणी साहित्याचे वाटप या कामांना गडाख यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी चांदा गावासाठी गेल्या काही दिवसांत जवळपास 11 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडाख यांचा ठिक-ठिकाणी सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सविता अडसुरे, पंचायत समिती सदस्या पार्वतीबाई जावळे, माजी सभापती कारभारी जावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, सरपंच ज्योती दीपक जावळे, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, ज्ञानदेव दहातोंडे, विजय चौधरी, संजय भगत, डॉ. विकास दहातोंडे, सोमनाथ दहातोंडे, अशोक चौधरी, लक्ष्मण दहातोंडे, बाळासाहेब दहातोंडे, सोमा बाजारे, बाळासाहेब दहातोंडे, अरुण बाजारे, सादिक शेख, भालके, लोखंडे, ग्रामविकास अधिकारी रजनीकांत मोटे, भाऊराव थिटे, नंदू जावळे, दीपक जावळे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button