नगर :जिल्ह्यात आढळले 11 कोरोनाबाधित | पुढारी

नगर :जिल्ह्यात आढळले 11 कोरोनाबाधित

नगर :  जिल्ह्यात गुरुवारी 11 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरातील 5 जणांचा समावेश आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांतील 2 तसेच राहाता, पारनेर, नेवासा व कर्जत या तालुक्यांतील प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे. गेल्या 24 तासांत अकोले, संगमनेर, कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी व शेवगाव या नऊ तालुक्यांत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 3 लाख 94 हजार 986 इतकी आहे. गुरुवारी 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 87 हजार 711 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 225 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

Back to top button