‘जोर्वे’त मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे वर्चस्व; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला भोपळा | पुढारी

‘जोर्वे’त मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे वर्चस्व; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला भोपळा

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातील जोर्वे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने 13 पैकी 13 जागा जिंकत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले.

विरोधी जनसेवा मंडळाला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा विकास मंडळाला पराभव पत्करावा लागला आहे. रविवारी ५ जून रोजी संस्थेच्या 13 जागांसाठी मतदान पार पडले. संस्थेच्या 584 सभासदांपैकी 567 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 240 ते 260 मतांच्या फरकाने शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

‘माझी वसुंधरा’ मध्ये शिर्डी नगरपंचायत प्रथम

विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे गोरक्षनाथ काकड, विठ्ठल काकड, सोपान कोल्हे, राजेंद्र थोरात, सुधीर थोरात, रघुनाथ दिघे, संजय दिघे, सतीश बोरकर, साहेबराव यादव, बादशहा इंगळे, केशरबाई इंगळे, अनसूया थोरात, विजय गिरी हे सर्वाधिक (434) मते घेऊन विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी रामदास वाकचौरे यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवारांचे मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजित थोरात, सत्यजित तांबे, रणजित देशमुख, दुर्गाताई तांबे, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात आदी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button