मुंबई, पुढारी ऑनलाईन : या वर्षी दहावीच्या परीक्षेत अगदी १०० टक्के गुण मिळाले असले तरी विद्यार्थ्यांना सहज अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना यंदा सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी यासंबंधीची माहिती सोमवारी मिळणार आहे.
वरील माहिती राज्य शिक्षण मंडळाच मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही दिनकर पाटील त्यांनी यावेळी सांगितले.
यंदा पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे लाखो विद्यार्थी राज्यात आहेत तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांवर आहे.
यंदाच्या अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांनाच अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येणार आहे.
यंदाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाले असले तरी, अकारावीसाठी त्यांना सीईटीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांशी नामांकित महाविद्यालयासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करता इंग्रजी भाषेचा पर्याय असेल तर मराठीचाही पर्याय विद्यार्थ्यांना असावा, अशी मागणी मराठी शाळा संघटना, मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.
पहा व्हिडीओ : ब्रा आणि बुब्जवर मी बोलले कारण…