अकोला : हेडफोनवरून वाद मामेभावाने केला आतेबहिणीचा खून | पुढारी

अकोला : हेडफोनवरून वाद मामेभावाने केला आतेबहिणीचा खून

अकोला; पुढारी वृत्तसेवा : राग कोणत्या थराला जाईल, काहीही सांगता येत नाही. त्याच रागातून अनेक आयुष्य उद्धवस्त झालेली आपण पाहिलेली आहेत.

असाच एक प्रकार अकोल्यात शनिवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आला. हेडफोन दिले नाही म्हणून सख्या मामेभावाने आतेबहिणीचा खून केला.

ही घटना अकोला येथील गौरक्षण रोडवरील माधव नगरात घडली. नेहा नंदनलाल यादव असे मृतक २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असे मारेकरी भावाचे नाव आहे.

अधिक वाचा :

या दोघांमध्ये हेडफोनवरुन वाद होवून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा मामेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हेही वाचले का? 

Back to top button