लैंगिक अत्याचार : मोर्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लैंगिक अत्याचार : मोर्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published on

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोर्शी ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी हा प्रकार घडला.

15 वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी नितीन राजू युवनाते (वय 22) व ज्ञानेश्वर रतिराम नागोते यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 20 जुलैपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा :

मोर्शीतील एका गावात राहणारी 15 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी घरातील अंगणात खेळत होती.

दरम्यान, आरोपींनी संगनमत करून तिला जबरीने दुचाकीवर बसविले आणि शेंदुरजना घाट येथील मावशीकडे नेले.

तेथील एका निर्जनस्थळी नेऊन तिचे हात बांधले आणि तिच्या तोंडात रुमाल दाबून वारंवार जबरीने लैंगिक अत्याचार केला. असा आरोप केला आहे.

पीडितेची आई घरी परतल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलीचा शोध घेणे सुरु केले. चौकशीनंतर मुलगी शेंदुरजना घाटमध्ये असल्याचे कळले.

त्यानुसार नातेवाईकांनी शेंदुरजना घाट गाठून मुलीला घरी आणले. त्यावेळी तीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आई मुलीला घेऊन थेट मोर्शी ठाण्यात पोहोचली.

पोलिसांनी पिडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. ठाणेदार सोळंके यांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली.

शनिवारी दुपारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20 जुलैपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news