Jalgaon Crime News | एकाचवेळी दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा | पुढारी

Jalgaon Crime News | एकाचवेळी दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव खुर्द गावातील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी राज संतोष कोळी (वय-१९ रा. जळगाव खुर्द) याला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम करावास व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा २२ मे रोजी सुनावली आहे.

जळगाव खुर्द गावातील आरोपी राज कोळी याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी गावातीलच एका भागात राहणाऱ्या ६ व ७ वर्षीय या दोन सख्ख्या चुलत बहिणींना राज कोळी याने त्यांच्या घरी बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीवर जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात दोन्ही पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायमूर्ती एस. एन. राजूरकर यांनी राज संतोष कोळी याला दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारवासीची शिक्षा सुनावली आहे.

तसेच कलम पाच वर्ष सश्रम करावास व पाच हजार रुपये दंड न भरल्यास. एक महिन्याची सश्रम करावास शिक्षा दिली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.

Back to top button