जळगाव : “येत्या २३ तारखेला मोठा मताधिक्याने कमळा समोरचे बटन दाबून विजयी करा”… उमेदवारांनीच बदलली मतदानाची तारीख | पुढारी

जळगाव : "येत्या २३ तारखेला मोठा मताधिक्याने कमळा समोरचे बटन दाबून विजयी करा"... उमेदवारांनीच बदलली मतदानाची तारीख

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेमध्ये उमेदवार जाहीर करून भाजपने आघाडी घेतलेली होती व त्यांनी उमेदवाराचा प्रचार करण्यातही आघाडी घेतलेली आहे. मात्र अति उत्साहात व अति आत्मविश्वास यामध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेली १३ मे ची तारीख बदलून २३ तारीख केल्याने मतदान करण्याचे आवाहन उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी चाळीसगाव मध्ये प्रसिद्ध गायक शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमात उपस्थित जनसंपदाला करून टाकले. त्यामुळे उमेदवारानेच निवडणूक आयोगाला शह देत आपल्या मर्जीप्रमाणे २३ तारखेला मतदानाला या हो… असे आवाहन केल्याचे समजते.

संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान ठेवलेले आहेत. या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये ठिकठिकाणी मतदान होणार आहे, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असतानाही भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवारांनी ज्यांचे नाव सर्वात पूर्वी जाहीर झाले त्यांनी जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे.

त्याच जळगाव लोकसभेच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ या चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाले की, महायुतीच्या लोकांना संघटनेने देणे शिकवले आहे. ज्या खुर्चीवर ते बसलेले आहे ते जनतेसाठी काम करण्यासाठी जनतेने मतदान दिले आहे. ते मतदान कर्जरूपाने दिले आहेत. त्याची आता व्याजासह परतफेड करण्यासाठी तत्परता ठेवली पाहिजे व समाजात एकोप्याने राहून विकास होईल यावर लक्ष दिले पाहिजे. ३५ वर्षानंतर जळगाव लोकसभेमध्ये महिलेला उमेदवारी देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन करीत असताना निवडणूक आयोगाने दिलेली १३ मे ची तारीख न सांगता २३ तारखेला मतदान करण्याच्या आवाहन करून टाकले. “तर…. येत्या २३ तारखेला मोठा मताधिक्याने कमळा समोरचे बटन दाबून विजयी करा” असे आवाहनच त्यांनी करून टाकले. यावरून आपण निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमाला तिलांजली देत आहोत. याचाही त्यांनी विचार केलेला दिसून नाही. परंतु २३ तारखेला कोणते मतदान होणार आहेत की ज्यांनी २३ तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले. असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button