

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचे संकेत असल्याचे या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण भारतात तमिळनाडू ते केरळ व पुढे आंध्रप्रदेश किनारपट्टीवर तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर पासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तिव्र होत असल्याने वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीने वाढला आहे. त्या परिणाम म्हणून राज्यातील अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात २८ ते ३०, मध्य महाराष्ट्रात २९ व ३०, तर मराठवाड्यात ३० नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई (३०),पुणे (२९, ३०), कोल्हापूर (२९,३०),ठाणे (३०), रायगड (२९,३०), रत्नागिरी (२९,३०), सिंधुदुर्ग (२९,३०), नाशिक (३०), नगर (२९), सातारा (२९,३०), सांगली (२९,३०)