पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र | पुढारी

पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र

पुणे : महेंद्र कांबळे : म्हातारपणीचा आधार असलेल्या पोटच्या मुलाने वडिलांचा अपघात झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात उपाचारासाठी पाठवले. मात्र, दहा वर्षे लोटल्यानंतरही त्यांना घरात घेतले नाही. पोटच्या मुलाने असे बेदखल केल्यानंतर ‘भरोसा सेल’च्या ज्येष्ठ नागरिक विभागाने पोलिसी खाक्या दाखवला अन् आजोबांना त्यांचे छत्र पुन्हा मिळाले. याबरोबरच त्यांना आता दर महिन्याला मुलाकडून 3 हजार रुपयेही मिळणार आहेत.

Shreyas Iyer : कसोटी पदार्पणातच शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू

घरी एकुलता एक मुलगा. 69 वर्षांच्या आजोबांची साथ त्यांच्या पत्नीने कधीच सोडली. अशा स्थितीत मुलगा आपल्या म्हातारपणाची काठी होईल, असे वाटले होते; परंतु त्यांच्या पुढ्यात नियतीने भलतेच वाढून ठेवले होते. सरकारी खात्यातून ते निवृत्त झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडविले. त्यानंतर मुलाने त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध सिंहगड रस्त्याजवळील एका वृद्धाश्रमात ठेवले. मुलाला वारंवार विनंती करूनही तो वडिलांना घरी घेऊन गेला नाही. मांडीचे हाड सरकल्याने त्यांना बरीच वर्षे वॉकरच्या साह्याने चालावे लागले.

26/11 Mumbai Attack : १३ वर्षे पूर्ण; दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम

निद्रानाशाचाही त्रास

आहे. परंतु आणखी काही दिवस वृद्धाश्रमात राहिल्यास आपण मरणार, अशी मन:स्थिती आजोबांनी करून घेतली. याच कारणामुळे 28 सप्टेंबरच्या पहाटे तीनला ते कसेबसे वृद्धाश्रमातून बाहेर पडले. चालता येत नसतानाही त्यांनी चार ते पाच किलोमीटर चालून ’भरोसा सेल’ गाठले. कधी अधिकारी येतील आणि कधी माझी व्यथा मी त्यांना सांगेल, अशा अवस्थेत अगदी सकाळीच आजोबा ’भरोसा सेल’च्या पायर्‍यांवर जाऊन अधिकार्‍यांची वाट पाहत होते. अखेर ज्येष्ठ नागरिक सेलच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक आशा गायकवाड आल्यानंतर त्यांनी तातडीने आजोबांची भेट घेतली.

Constitution Day 2021 : आपल्या संविधानाचे हस्तलेखन कोणी केले माहित आहे का? 

त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि लेखी स्वरूपात ’भरोसा सेल’कडे तक्रार दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोडखे यांनी मुलाला बोलवून घेतले. त्याचे समुपदेशन केले. त्याला एक महिन्याची मुदत दिली आणि 30 ऑक्टोबरपर्यंत वडिलांना घरी नेण्यास सांगितले. मात्र, 15 नोव्हेंबर उजाडला तरी मुलगा त्यांना घेऊन गेला नाही. त्यानंतर आजोबांनी पुन्हा ’भरोसा सेल’शी संपर्क साधला. त्यावर पोलिसांनी मुलाला फोन केला. मात्र, तो उचलेना. अखेर पोलिस मार्शल त्याच्या घरी पाठवून त्याला बोलावून घेण्यात आले.

ST Workers strike : राज्यात एसटीच्या चाकांनी घेतला वेग

पोलिसी खाक्या दाखवताच मुलाने फ्लॅटचा ताबा, त्यांचे पेन्शनचे पासबुक त्यांच्या हवाली करून महिन्याला तीन हजार देण्याचेही मान्य केले. तसे त्याने पोलिसांना लिहूनही दिले. आपले छत्र आपल्याला मिळाल्याने आजोबाही आनंदी झाले. त्यांनी ’भरोसा सेल’चे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.

अश्विनी बिद्रे हत्याकांड : सर्व सर्टिफिकेटस् मीच करून सहीदेखील मीच केली आहे

‘‘भरोसा सेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच लहान मुलांसाठी काम केले जाते. त्या आधारे त्यांच्या तक्रारीचे निरसन करून त्यांना मदत केली जाते. वृध्द नागरिकांसह, महिलांचा भरोसा सेलविषयी भरोसा दृढ झाला आहे. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर भरोसा सेलकडून पाठपुरावा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना तक्रार असल्यास त्यांनी भरोसा सेलशी संपर्क साधल्यास त्यांना मदत मिळते.’’

                                                                                                                        – श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त, गुन्हे.

‘‘मुलाने वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर त्यांचे पासबुक, एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेतले होते. त्यांच्या नावावर असलेला फ्लॅटही त्याने भाडेतत्त्वावर दिला होता. त्या फ्लॅटमध्येही तो त्यांना राहू देत नव्हता. आजोबा भरोसा सेलकडे आल्यानंतर मुलाला बोलावून घेत आम्ही त्याचे समुपदेशन केले. त्याला समजावून सांगितले. अखेर त्याने वडिलांचे छत्र परत केले. अशाच तक्रारींचे निरसन भरोसा सेलडून करण्यात येते.’’

                                                                     – योगिता बोडखे, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक कक्ष.

Back to top button