राज्यात यंदा ठराविक व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच पसंती | पुढारी

राज्यात यंदा ठराविक व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच पसंती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात यंदा इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवल्याचे दिसून आले आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला असून, थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र

राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेटमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करण्याची मुदत संपल्याने, इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे.

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

इंजिनिअरिंगसाठी 1 लाख 7 हजार 732 विद्यार्थ्यांनी, एमबीएसाठी 54 हजार 227 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ‘एमसीए’ला 10 हजार 855 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील काही विद्यार्थी अजूनही प्रवेशप्रक्रियेपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यास विद्यार्थ्यांकडून नोंदणीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगात सुरू

दरम्यान, आर्किटेक्चर आणि फार्मसीच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद लाभला आहे. इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एमई) प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटल्याचे ‘सीईटी सेल’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Constitution Day : पीएम नरेंद्र मोदी, “पक्षांची घराणेशाही लोकशाहीसाठी संकट…”

थेट द्वितीय वर्ष प्रवेशाला यंदा प्रतिसाद

डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षी 62 हजार 485 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ती वाढून 69 हजार 448 झाली आहे. त्यामुळे 6 हजार 963 विद्यार्थी वाढल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष फार्मसी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 12 हजार 374 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या दोन हजारांनी वाढली आहे.

26/11 Mumbai Attack : १३ वर्षे पूर्ण; दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम

Back to top button