बारामती : पोलिसांच्या भीतीने नदीत उडी टाकल्याने बुडून एकाचा मृत्यू | पुढारी

बारामती : पोलिसांच्या भीतीने नदीत उडी टाकल्याने बुडून एकाचा मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील सोनगाव येथे पोलिस पथक अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेले असताना भितीपोटी त्याने पळ काढत निरा नदीवरील बंधाऱयात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

बारामती शहर पोलिसांकडून वेश्या व्यवसायाचा बिमोड; दलाल महिलेवर कारवाई

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या संबंधित वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Constitution Day : पीएम नरेंद्र मोदी, “पक्षांची घराणेशाही लोकशाहीसाठी संकट…”

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला. लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात त्याने उडी मारत पलिकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

त्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सोनगावातील स्थिती अधिकच चिघळली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवली आहे.

पुणे : पोटच्या मुलाने केले बेदखल; पण पोलिसी खाक्याने वृद्धाला मिळवून दिले छत्र

Back to top button