Constitution Day : पीएम नरेंद्र मोदी, “पक्षांची घराणेशाही लोकशाहीसाठी संकट…” | पुढारी

Constitution Day : पीएम नरेंद्र मोदी, "पक्षांची घराणेशाही लोकशाहीसाठी संकट..."

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : संविधान दिनानिमित्ताने (Constitution Day) आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर टीका केली. वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पश्न लोकशाहीसाठी मोठं संकट आहे. ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचं तत्व नाही, ते लोकशाहीचं संरक्षण कसे करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली.

काॅंग्रेस, आप, शिवसेना पक्षांसहीत एकूण १४ विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारन आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त आयोजिक केलेल्या कार्यक्रमात बहिष्कार टाकण्यात आला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर संविधाव दिवस साजरा करायला हवा होता. जेणे करून पुढील पिढ्यांचा संविधान कंस निर्माण झालं हे कळले असते. मात्र, संविधान दिन खूप उशिरा साजरा झाला”, असंही पंतप्रधान मोदींना सांगितले.

“डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव व्हावं हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचं पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणं ही काळजीची बाब आहे. ज्या पक्षांनी लोकशाहीचं तत्व हरवले आहे, ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारत एका संकटातून जात असल्याचं दिसत आहे. ते संकट घराणेशाही असलेले पक्ष आहेत”, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

“काही राजकीय पक्ष हे काही कुटुंबांकडून काही कुटुंबांसाठी चालवले जातात. हे पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत. घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पक्षात येऊ नये असं नाही, तर एखादा पक्ष अनेक वर्षे एका कुटुंबाकडून चालवला जाणे हे लोकशाहीसाठी संकट आहे. आपलं संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देत नाही. न्यायालयाने एखाद्याला भ्रष्टाचाराची शिक्षा दिली असेल आणि त्यानंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचं गुणगान होत असेल तर देशातील तरुणांच्या मनात भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालण्याला मान्यता मिळते”, असंही प्रत्यक्ष भाष्य मोदी यांनी केलं आहे.

पहा व्हिडीओ : शक्ती मिल बलात्कार प्रकरण : 7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

Back to top button