अहमदनगर झेडपीमध्ये बदल्यांचा 'रात्रीस खेळ चाले....!' | पुढारी

अहमदनगर झेडपीमध्ये बदल्यांचा 'रात्रीस खेळ चाले....!'

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या तीन दिवस चाललेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत सामान्य प्रशासन, अर्थ, कृषी, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघू व पाटबंधारे, बांधकाम, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाच्या 290 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, सीईओंच्या एैनवेळच्या बैठकांमुळे वेळेचे गणित चुकल्याने गुरुवारी मध्यरात्री दीडपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. महिला कर्मचार्‍यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पालघर : खेळताना गच्चीवरुन पडल्‍याने चिमुरडीचा मृत्यू

गेल्या वर्षी 238 कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या झाल्या होत्या. तर, यावर्षी बदलीपात्र कर्मचारी संख्या वाढल्याचे दिसून आले. सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या देखरेखीत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी पारदर्शीपणे बदली प्रक्रिया राबविली.

Corona active Cases : देशात केवळ ०.०३ टक्के सक्रिय कोरोनाग्रस्त रूग्ण

दरम्यान, प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्या झाल्यानंतर आता स्थानांतरण बदल्यांकडेही कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.
विभागनिहाय बदल्यांची आकडेवारी तीन दिवसांच्या या बदल्यांच्या कार्यक्रमात सामान्य प्रशासन 51, अर्थ विभाग 6, कृषी विभाग 5, महिला व बालकल्याण 9, पाणी पुरवठा 2, लघु पाटबंधारे 2, बांधकाम उत्तर 10, पशुसंवर्धन 18, आरोग्य विभाग 94, शिक्षण 7 आणि ग्रामपंचायत विभाग 99 अशी एकूण 290 कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे. यात प्रशासकीय 122, विनंती 132, आपसी 36 बदल्यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया प्रशासनाने पारदर्शीपणे राबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा: 

सातारा : इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवती ठार

संभाजीराजेंनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवावी : संजय राऊत

तुम्हाला 360 रुपयांची सिमेंटची गोणी 260 रुपयांना मिळेल म्हणत वकिलाला साडेसहा लाखांना गंडा

Back to top button